पुणे: माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. उषा काकडे असे त्यांचे नाव आहे. उषा काकडे यांनी मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. काकडे यांना तातडीने रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार कौटुंबिक कारणातून घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
रुबी हॉस्पिटलने काकडे यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती दिली आहे. याबाबत रुबी हॉलचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी माहिती दिली. सध्या उषा काकडे यांची प्रकृती स्थिर असल्याची देखील माहिती हॉस्पिटलने दिली आहे.


