शिरुर (पुणे) : शहरातील पुणे-नगर महामार्गावरून प्रवास करणारे कुटुंब रात्रीच्या वेळी चालकाला झोप लागल्याने रस्त्याकडेला वाहनामध्ये झोपले असता, दोघांनी सत्तूरचा धाक दाखवून दागिने लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुलोचना राठोड (वय ४० रा. उत्तरवाडोना जि. यवतमाळ) यांनी फिर्याद दिली आहे.
शहरातील पुणे-नगर महामार्गावरून राठोड कुटुंबीय कारमधून जाताना कारचालकाला झोप आल्याने येथील बोऱ्हाडे मळा येथे कार लावून झोपले. पहाटेच्या वेळी दुचाकीवरून दोन युवक आले. त्यांनी सर्वांना उठवून सत्तूरचा धाकाने सुलोचना यांचे मंगळसूत्र, गंठण, रिंगा दागिने घेऊन पोबारा केला.


