Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अखेर प्रशांत जगतापांचा ठरलं; ‘या’ पक्षात करणार प्रवेश? उद्धव ठाकरेंनीही खास ऑफर, नेमकं काय घडलं?

अखेर प्रशांत जगतापांचा ठरलं; ‘या’ पक्षात करणार प्रवेश? उद्धव ठाकरेंनीही खास ऑफर, नेमकं काय घडलं?

Prashant Jagtap : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी अजित पवार गटासोबत युतीच्या चर्चांमुळे पक्षाचा राजीनामा दिला. आता त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. आज (२६ डिसेंबर) दुपारी मुंबईतील टिळक भवनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

प्रशांत जगताप यांनी राजीनामा देताना स्पष्ट केले की, ते महायुतीतील कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. त्यांची लढाई संविधान आणि पुरोगामी चळवळीसाठी आहे. ते भाजपला आव्हान देऊ शकणाऱ्या पक्षाची निवड करतील, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) गटाकडूनही जगताप यांना मोठी ऑफर देण्यात आली. काल (२५ डिसेंबर) रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रशांत जगताप यांना फोन करून सुमारे ९ मिनिटे चर्चा केली. “तुमचा योग्य सन्मान राखू, आम्ही भाजपसोबत कधीही जाणार नाही,” अशी ऑफर ठाकरे यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी उबाठा गटाच्या नेत्यांनीही जगताप यांना पक्षात येण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र, जगताप यांनी त्यावेळी “मी काँग्रेस विचारांचा आहे, त्यामुळे उबाठाकडे येऊ शकत नाही,” असे सांगितले.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना प्रशांत जगताप यांनी उद्धव ठाकरे आणि सचिन आहिर यांचे आभार मानले. “माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला उद्धव साहेबांनी वेळ दिला. भाजपचा कडवा विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी माझ्या भावना समजून घेतल्या आणि पक्षात काम करण्याची ऑफर दिली. मी त्यांचा कायम ऋणी राहीन,” असे जगताप म्हणाले. तरीही त्यांनी काँग्रेसकडे झुकाव दर्शवला.

पुणे महापालिकेत काँग्रेस आणि उबाठा गट एकत्र लढण्याच्या चर्चा सुरू असताना जगताप यांचा काँग्रेस प्रवेश विरोधी आघाडीला बळ देईल. शरद पवार आणि अजित पवार गट पुण्यात एकत्र येण्याच्या तयारीत असल्याने महाविकास आघाडीत फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर जगताप यांचा निर्णय पुण्यातील राजकारण आणखी रंजक करणारा ठरेल. पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा लवकरच होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!