Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात ६२ लाखांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यावर गुन्हा

पुण्यात ६२ लाखांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यावर गुन्हा

पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी दोन महिलांसह तिघांची ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विश्रांतवाडी भागातील एका ३८ वर्षीय महिलेची चोरट्यांनी ४२ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केली. या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. तक्रारदार महिलेच्या मोबाईल क्रमांकावर जानेवारी महिन्यात संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवर जादा परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी या महिलेला जाळ्यात ओढले. महिलेला शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक योजनांची माहिती देऊन तिला बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने ४२ लाख २९ हजार रुपये जमा केले. सुरुवातीला महिलेला परताव्यापोटी पैसे देण्यात आले. त्यानंतर महिलेला पैसे दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.

खराडी भागातील एका व्यावसायिकाचीही शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्यासंदर्भात खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर, घरातून ऑनलाईन पद्धतीने कामाची संधीचे (ऑनलाईन टास्क) आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेची १० लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार

महिला नऱ्हे परिसरात वास्तव्याला आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून समाज माध्यमातील मजकूर, तसेच चित्रफितींना दर्शक पसंती मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. या महिलेने चोरट्यांच्या खात्यात रक्कम जमा केली. सुरुवातीला तिला परतावा दिल्यानंतर चोरट्‌यांनी दूरध्वनी बंद करून टाकले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!