पुणे : पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीने बदला घेतला आहे. शुक्रवारी नाना पेठ परिसरात झालेल्या हल्ल्यात गणेश कोमकर याच्या मुलाचा खून करण्यात आला आहे. गोविंद कोमकर असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस तपासात तो आंदेकर टोळीच्या विरोधी गटाशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे.
यामधील धक्कादायक गोष्ट म्हणजे, “टपका रे टपका एक और टपका, तीन मे से एक गया दो ये मटका.. गाणं डीजे वर वाजवत खून केला आहे. त्यामुळे पुणे शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात गणेश कोमकर हा मुख्य आरोपी असल्याचे मानले जाते. या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने रेकी करून गोविंदचा काटा काढला असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. विशेष म्हणजे आंदेकर टोळीने रेकी एका भागात केली व प्रत्यक्ष निशाणा दुसऱ्या ठिकाणी साधला. त्यामुळे गुन्ह्याचा तपास देखील गुंतागुंतीचा बनला आहे.
या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा आंदेकर व कोमकर गट यांच्यातील संघर्ष रक्तरंजित स्वरूपात समोर आला आहे. त्यामुळे नाना पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या खुनानंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून गुन्हे शाखेकडून या हत्येचा तपास सुरू आहे.


