मुंबई : सध्या अनेक चित्रपट रिलीज होत आहेत. त्यात 2016 मध्ये पहिल्यांदा टायगर श्रॉफचा बागी चित्रपट आला. त्या चित्रपटात टायगरचा अभिनय चांगलाच पसंतीस उतरला होता. आता बॉलिवूडला त्याचा नवीन अॅक्शन हिरो सापडला आहे. टायगरने चित्रपटात स्वतःचे स्टंट ज्या पद्धतीने केले ते पाहण्यासारखे होते. मात्र, टायगर श्रॉफचा अॅक्शन ‘बागी’मध्ये दमदार असा काही दिसला नाही.
जवळपास पाच वर्षांनंतर परतलेल्या ‘बागी’ फ्रँचायझीचा चौथा पार्ट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा एक ए-रेटेड चित्रपट आहे. ज्याच्या ट्रेलरमध्ये खूप थ्रीलिंग सीन दाखवण्यात आला आहे. टायगर श्रॉफने या चित्रपटात खूप मेहनत घेतल्याचे दिसून आले. काही दृश्ये होती ज्यात त्याची मेहनत दिसून येत होती. चित्रपटात त्याने पूर्वीपासून अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी केल्या. पण एक अभिनेता म्हणून त्याच्या अभिनयाने कोणताही ठसा उमटवला नसल्याचे दिसून आले.
संजय दत्त चित्रपटात खूप अॅक्शन मोडमध्ये दिसला. मात्र, तो बऱ्याच काळानंतर अशी भूमिका करताना दिसला आहे. पण त्याच्या व्यक्तिरेखेत खोली नसल्याने त्याचे काम प्रभावी वाटले नाही. ‘बागी 4’ मध्ये ग्लॅमर वाढवण्यासाठी सोनम बाजवा आणि मिस युनिव्हर्स विजेती हरनाज कौर संधू यांचाही समावेश आहे. ज्यांनी चित्रपटात त्यांची पात्रे योग्यरित्या साकारली. हरनाजने तिच्या पहिल्या चित्रपटात अपेक्षेपेक्षा खूप चांगले काम केले. मात्र, तरीही या चित्रपटाने म्हणावी तशी कमाई केली नसल्याचे दिसून आले.


