Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Cyclone Alert : नवे चक्रीवादळ धडकणार? महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा, IMD चा अलर्ट

Cyclone Alert : नवे चक्रीवादळ धडकणार? महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा, IMD चा अलर्ट

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार होणारी नवीन वादळ प्रणाली ४ नोव्हेंबरपासून चक्रीवादळात रूपांतरित होणार असून, यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांसाठी हवामान खात्याने (IMD) सायक्लोन अलर्ट जारी केला आहे. मोंथा वादळाचा धोका टळला तरी या नव्या प्रणालीमुळे महाराष्ट्रासह इतर भागांत पावसाची पुन्हा हजेरी लागण्याची शक्यता आहे.

आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार अपेक्षित आहेत. कालच्या २४ तासांत राज्यात हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या, विशेषतः कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता.

विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या १५ जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील हे चक्रीवादळ राज्याच्या हवामानावर परिणाम करू शकते, ज्यामुळे सततच्या बदलांमुळे पावसाला अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचे IMD ने नमूद केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!