Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे हादरलं..! नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध; भावानेच केली भावाची निर्घृण हत्या

पुणे हादरलं..! नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध; भावानेच केली भावाची निर्घृण हत्या

Pune murder, Katraj crime : पुण्यातील कात्रज परिसरात धक्कादायक हत्याकांडाने हादरला आहे. नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून चुलत भावानेच २२ वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून निर्घृण खून केला. भारती विद्यापीठ पोलीसांनी आरोपीला ४८ तासांच्या आत अटक करत गुन्हा उघडकीस आणला.

मृत तरुणाचे नाव अजय गणेश पंडित (वय २२) असून तो कात्रजच्या खोपडेनगर येथील एका गृहप्रकल्पाच्या आवारात राहत होता. आरोपी अशोक कैलास पंडित (वय ३५, रा. सध्या मोशी, मूळ झारखंड) हा त्याचा चुलत भाऊ आहे. दोघेही मूळचे झारखंडचे असून गेल्या चार वर्षांपासून पुण्यात मजुरी करतात.

१७ नोव्हेंबर रोजी रात्री अजय भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडला आणि परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल झाली. तपासादरम्यान पोलिसांना अशोकच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कडक भूमिका घेताच त्याने गुन्हा कबूल केला.

अशोकने सांगितले की, संशयाच्या भरात त्याने अजयवर चाकूने वार केले. नंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह कात्रजच्या गुजर निंबाळकरवाडी येथील डोंगराळ भागात फेकून दिला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे, सहाय्यक निरीक्षक स्नेहल थोरात, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांच्या पथकाने अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकले. पुढील तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!