इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सायकलपटू हरीश डोंबाळे याने आपल्या मेहनतीच्या जोरावर ओडीसात आयोजीत केलेल्या सायकलिंग स्पर्धेत पहिले स्थान पटकावले. त्याचा हा विजय नुकताच साजरा करण्यात आला. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी हजेरी लावली. ‘सायकलिंग स्पर्धेत हरीश दिपक डोंबाळे याने प्रथम क्रमांक मिळवून महाराष्ट्रासह इंदापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल केले‘ असल्याचे गौरवोद्गार राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.
हरीश याने ओडिसा संबलपूर येथे संपन्न झालेल्या ३० व्या राष्ट्रीय रोड रेस १०० किमी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया स्पर्धेत ज्युनिअर वयोगटामधून देशात प्रथम क्रमांक व उत्तराखंड रुद्रपुर येथे ट्रॅक स्पर्धेत टीम स्प्रिंटमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याच्या या यशाबद्द्ल
कृषीमंत्री भरणे यांनी भरणेवाडी (ता.इंदापूर ) येथील आपल्या निवासस्थानी सन्मान केला. यावेळी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग, हरीश चे वडील दिपक,आई आशा व आजोबा इतर मान्यवर व न्हावी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
हरीश ने जिद्दीने १०० किलोमीटर मास्टर्स सायकलिंग स्पर्धेत भारतात प्रथम क्रमांक सुवर्ण पदक मिळवून विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचा नावलौकिक केला असल्याचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले.


