Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जय पवारांचं लग्न परदेशात! 400 पाहूण्यांना आमंत्रण; ‘असा’ असेल संपूर्ण कार्यक्रम

जय पवारांचं लग्न परदेशात! 400 पाहूण्यांना आमंत्रण; ‘असा’ असेल संपूर्ण कार्यक्रम

पुणे: नुकताच बीकेसी येथील जिओ सेंटरमध्ये 30 नोव्हेंबर रोजी युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाहसोहळा थाटात संपन्न झाला. या सोहळ्याला पवार कुटुंब युगेंद्र आणि तनिष्का यांना शुभआशिर्वाद देण्यासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी देखील सहकुटुंब या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. तसेच राजकीय क्षेत्रासह इतर क्षेत्रातील मान्यवरही लग्नसोहळ्यासाठी उपस्थित होते.

एका पवारांच्या लग्नानंतर आता दुसऱ्या एका पवारांच्या लग्नाची लगीनघाई पवार कुटुंबात सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या धाकट्या लेकाचा विवाहसोहळा 5 डिसेंबर रोजी पार पडणार असून, हा विवाहसोहळा मुंबई, पुण्यात नाही तर परदेशात होणार आहे. त्यामुळे या लग्नासाठी पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे विवाह सोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमासाठी स्वतंत्र ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. बहरीनमध्ये जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. 5 डिसेंबरच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने पवार-पाटील कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण असून त्यानिमित्ताने दोन्ही कुटुंब एकत्र येणार आहेत.

या लग्नसोहळ्यात जवळच्या केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नानिमित्त 4 डिसेंबर रोजी मेहंदी, 5 डिसेंबर रोजी हळद, वरात आणि मुख्य लग्नसोहळा, 6 डिसेंबर रोजी संगीत, तर 7 डिसेंबर रोजी स्वागत समारंभ होणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी जय पवार यांनी होणाऱ्या पत्नीसह शरद पवार यांचे आशीर्वाद घेत फोटो शेअर केले होते. त्यामुळे जय पवारांच्या लग्नातही शरद पवार, सुप्रिया सुळे आणि कुटुंब सहभागी होणार आहेत. जय पवार यांच्या बहरीनमधील विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, लग्नाची पत्रिकाही समोर आली आहे. यामुळे काही जवळच्या लोकांच्या उपस्थित पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्याची एक वेगळीच चर्चा होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!