इंदापूर : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्निक, इंदापूर येथे L&T डिफेन्स, तळेगाव (पुणे) यांच्या वतीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह उत्साहात पार पडली. या प्रक्रियेत ९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैकी २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा १६,५०० रुपये वेतनासह मोफत ट्रान्सपोर्ट व मेस सुविधा देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात संधी मिळाली असून महाविद्यालयाच्या गुणवत्तेत भर पडली आहे.
कार्यक्रमादरम्यान एच.आर. मॅनेजर विलास पवार यांनी करिअर मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे व प्रा. योगेश जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


