Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महाराष्ट्र गारठला..! ‘या’ ठिकाणाचा पारा ५ अंशावर, पुणेकर थंडीने गारठले

महाराष्ट्र गारठला..! ‘या’ ठिकाणाचा पारा ५ अंशावर, पुणेकर थंडीने गारठले

Today Weather : महाराष्ट्रात उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवामानामुळे गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत आहे. राज्यातील अनेक भागांत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले असून काही ठिकाणी तो ५ ते ६ अंशांशापर्यंत खाली आला आहे. लोक रात्री शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत.

शुक्रवारी (१२ डिसेंबर) राज्यातील सर्वात कमी तापमान जेऊर (पुणे जिल्हा) येथे ५.० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर परभणीत ५.५ अंश, निफाडमध्ये ५.७ अंश, धुळे व अहिल्यानगरमध्ये प्रत्येकी ६.१ अंश, जळगावमध्ये ६.९ अंश तापमानाची नोंद झाली. पुण्यात किमान तापमान ८.३ अंशांपर्यंत खाली आले आहे.

हवामान विभागाने सांगितले की, जेऊर, धुळे, निफाड, जळगाव, अहिल्यानगर, परभणी, यवतमाळ या भागांत शुक्रवारी “थंडीची लाट” (cold wave) स्थिती होती. आजपासून थंडीची तीव्रता किंचित कमी होईल, मात्र हुडहुडी भरणारी थंडी पुढील काही दिवस कायम राहील, असा अंदाज आहे.

महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये एवढी थंडी फारच क्वचित पाहायला मिळते. राज्यातील नागरिकांना उबदार कपडे, शेकोट्या आणि गरम पेयांचा आधार घ्यावा लागत आहे. थंडीमुळे सकाळी व रात्री धुकेही दाट होत असल्याने वाहनचालकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काही प्रमुख शहरांचे आजचे किमान तापमान

पुणे : ८.३ अंश सेल्सियस
अहिल्यानगर : ७.३ अंश सेल्सियस
धुळे : ६.१ अंश सेल्सियस
जळगाव: ६.९ अंश सेल्सिय
सजेऊर: ५.० अंश सेल्सियस
‎‎कोल्हापूर: १३.५ अंश सेल्सियस
महाबळेश्वर: १२.२ अंश सेल्सियस

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!