Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Monsoon Update : राज्यभर उकाड्याचा कहर! मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान विभागाचा अंदाज काय?

Monsoon Update : राज्यभर उकाड्याचा कहर! मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान विभागाचा अंदाज काय?

Monsoon Update : राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष सध्या मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. मात्र, जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरी महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनची प्रगती मंदावल्याने पावसाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. उष्णता आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले असून शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक हवामान प्रणाली सध्या सक्रिय नसल्याने त्याची गती कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातील उर्वरित भागांमध्ये मान्सून पोहोचण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो.

दरम्यान, आज पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

राज्याच्या इतर भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून काही ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात. मात्र, बहुतांश भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवसांत मध्य अरबी समुद्रासह महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग आणि छत्तीसगडमध्ये मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनातील विलंबामुळे खरीप हंगामाच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आता शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष पुढील हवामान अंदाजाकडे लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!