Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यात उष्णतेचा कहर कायम; वादळी पावसासाठी येलो अलर्ट, अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान बदलाचा इशारा

राज्यात उष्णतेचा कहर कायम; वादळी पावसासाठी येलो अलर्ट, अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान बदलाचा इशारा

Weather Update : महाराष्ट्रात सध्या एकीकडे तीव्र उकाडा जाणवत असताना दुसरीकडे काही भागांत पूर्वमोसमी वादळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाने आज राज्यातील विविध भागांसाठी येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. विशेषतः अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर येथे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

गेल्या २४ तासांत विदर्भात उष्णतेचा मोठा प्रभाव दिसून आला. अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर येथे तापमान ४५ अंशांहून अधिक नोंदले गेले, तर यवतमाळ, चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथेही ४३ अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. याउलट महाबळेश्वर येथे २०.९ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवले गेले.

मान्सूनबाबतही हवामान विभागाने दिलासा दिला आहे. २६ ते ३१ मे दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात, साधारण ६ जूनच्या आसपास, तो कोकण किनारपट्टीवर पोहोचू शकतो. त्यामुळे राज्यात लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!