Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Weather Alert : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला; थंड वाऱ्यांच्या लहरींमुळे हवामानात मोठा बदल

Weather Alert : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला; थंड वाऱ्यांच्या लहरींमुळे हवामानात मोठा बदल

Maharashtra Winter Temperature Update : पाकिस्तानसह शेजारील देशांकडून भारतात शिरकाव करणाऱ्या थंड वाऱ्यांच्या लहरींमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, कोकणासह राज्यातील अनेक भागांत तापमानात लक्षणीय घट झाली असून पुढील २४ तास ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानुसार, ईशान्य मोसमी वाऱ्यांचा हंगाम संपला असून सध्या उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. सोमवारी निफाड येथे किमान ७.९ अंश सेल्सिअस, गोंदिया येथे ९.८ अंश, तर धुळे येथे १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

आज राज्यात काही भागांत थंडीचा जोर किंचित कमी होऊ शकतो. किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असून, काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान आणि उकाडा जाणवू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तापमानात हळूहळू वाढ होत असल्याने गारठ्याची तीव्रता कमी-अधिक होत आहे.

यवतमाळमध्ये थंडीचा आरोग्यावर परिणाम

यवतमाळ जिल्ह्यात अचानक बदललेल्या हवामानामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि अपचनाचे रुग्ण वाढले आहेत. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने गर्दी पाहायला मिळत आहे. दुपारी कडक ऊन, तर सकाळ-संध्याकाळ गारठा अशी परिस्थिती असल्याने नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!