Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससून हल्ला प्रकरणातील फरारी आरोपी अखेर गजाआड

Pune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससून हल्ला प्रकरणातील फरारी आरोपी अखेर गजाआड

Pune Crime: पुणे शहरात वाढत चाललेल्या टोळीयुद्ध आणि गंभीर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी आक्रमक धोरण स्वीकारले असून संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मोक्का’सारख्या कठोर कायद्याचा आणि तडीपारीसारख्या उपायांचा प्रभावी वापर केला जात आहे. याच मोहिमेअंतर्गत, ससून रुग्णालयात तीन वर्षांपूर्वी घडलेल्या थरारक हल्ल्याशी संबंधित एका कुख्यात फरार आरोपीला अटक करण्यात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

दरम्यान, 2022 मध्ये ससून रुग्णालयाच्या आवारात घडलेली घटना संपूर्ण शहराला हादरवणारी ठरली होती. गंभीर गुन्ह्यांत अडकलेला तुषार हंबीर याला उपचारासाठी कारागृहातून ससूनमध्ये आणण्यात आले होते. याच संधीचा फायदा घेत हल्लेखोरांच्या टोळीने रुग्णालयात घुसखोरी करत त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. कोयत्यांनी सपासप वार करण्यात आले, तसेच पिस्तुलातून गोळीबारही करण्यात आला होता. या हल्ल्यात हंबीरच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला पोलीस कर्मचारी आणि त्याचा नातेवाईकही जखमी झाले होते.

हेही वाचा – Pune Cold Wave : पुणे परिसरात थंडीचा जोर कायम; पाषाणमध्ये किमान तापमान ८.३ अंशांवर

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान एकूण 11 आरोपींवर आरोप करण्यात आला होता. गुन्ह्याचे स्वरूप आणि संघटित टोळीचा सहभाग लक्षात घेता सर्व आरोपींवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली. बहुतांश आरोपींना अटक झाली होती, मात्र रोहित ऊर्फ तम्मा भोसले हा आरोपी दीर्घकाळ पोलिसांना हुलकावणी देत फरार होता.

हेही वाचा – Pune Land Scam: पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर संजय राऊतांचं मोठं भाष्य; अजित पवारांवर थेट प्रहार, म्हणाले…

फरार आरोपीला अटक

गेल्या तीन वर्षांपासून सतत ठिकाणं बदलत तो पोलिसांच्या नजरेतून बचावत होता. अखेर गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी अचूक नियोजन करत सापळा रचला आणि भोसले याला अटक केली. या कारवाईमुळे ससून रुग्णालय हल्ला प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असून, पुण्यातील संघटित गुन्हेगारीविरोधातील लढ्यात हा मोठा टप्पा मानला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!