Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: ‘माझ्या बहिणीपासून दूर रहा’; माथेफिरू बॉयफ्रेंडने 29 वेळा वार करत युवकाला संपवले

Pune Crime: ‘माझ्या बहिणीपासून दूर रहा’; माथेफिरू बॉयफ्रेंडने 29 वेळा वार करत युवकाला संपवले

पुणे: पुण्यात एका 18 वर्षीय तरुणाची निर्घूण हत्या करण्यात आली. बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड आणि तिच्यापासून दूर रहा, असे सांगितल्यानंतर संतापलेल्या बॉयफ्रेंडने सहा जणांच्या मदतीने त्याचा खून केला. पुण्यातील चंदनगरमध्ये असलेल्या ऑक्सिजन पार्कमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली. 6 डिसेंबर रोजी हत्येची घटना घडली.  मात्र, प्रेमसंबंधाच्या प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.

लखन ऊर्फ सोन्या सकट असे 18 वर्षीय हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. 18 वर्षीय लखन बाळू सकट यांच्या मावस बहिणीसोबत यश नावाच्या मुलाचे प्रेमसंबंध होते. त्यावरूनच लखनने यश गायकवाडला तिच्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. ‘बहिणीशी असलेले प्रेमसंबंध तोड आणि तिच्यापासून लांब रहा’, असे तो यशला सातत्याने सांगत होता.

पार्कमध्ये बोलवलं आणि काय घडलं?

6 डिसेंबर रोजी लखन आणि यश यांच्यात प्रेमप्रकरणावरूनच वाद झाला. यश रागात होता. त्याने भांडण मिटवायचे आहे, असे म्हणत लखनला भेटायला बोलवले. लखन सायंकाळी ऑक्सिजन पार्क उद्यानात आला.

यशने त्याच्या मित्रांनाही बोलावले होते. पार्कमध्ये भेटल्यानंतर लखन आणि यश यांच्यात वाद सुरू झाला. वादातच यश आणि त्याच्या मित्रांनी लखनवर धारदार शस्त्राने हल्ला केला. 29 वार लखनवर करण्यात आले. त्यानंतर यश आणि त्याचे मित्र पळून गेले.

लखनची हत्या करणारे आरोपी कोण?

पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी आले, तेव्हा तिथे रक्ताचा सडा पडलेला होता. पण, जखमी लखनबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयांशी संपर्क साधणे सुरु केले. त्यात एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे कळले.

घटनेची माहिती आणि आरोपींबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 6 तासांमध्येच हत्या प्रकरणातील आरोपींना अटक केली. या प्रकरणात केशव बबन वाघमारे यांनी तक्रार दिली असून, पोलिसांनी शंकर दारकू (वय 20), यश रवींद्र गायकवाड (वय 19), जानकीराम परशुराम वाघमारे (वय 18), महादेव पांडुरंग गंगासागरे (वय 19), बालाजी आनंद (वय 19) आणि करण निवृत्ती सरवदे (वय 18) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!