Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

MPSC Exam Postpone: MPSC परीक्षेवर राज्यातील निवडणुकांचे सावट! 21 डिसेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलली

MPSC Exam Postpone: MPSC परीक्षेवर राज्यातील निवडणुकांचे सावट! 21 डिसेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलली

MPSC Exam Postpone: राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची २१ डिसेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. काही दिवसांपासून या परीक्षेच्या आयोजनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली होती. अखेर आयोगाने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करून नवीन तारखा जाहीर केल्या आहेत.

मतमोजणीच्या दिवशीच परीक्षा असल्याने बदल अपरिहार्य

राज्य निवडणूक आयोगाने २१ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पाडण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर, परीक्षा आणि मतमोजणी दोन्ही एकाच दिवशी होणार असल्याने प्रशासनाकडून संभाव्य अडचणींचा अहवाल एमपीएससीने मागविला होता. काही जिल्ह्यांनी परीक्षा केंद्र आणि मतमोजणी केंद्र अत्यंत जवळ असल्याचे, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांमुळे निर्माण होणारी गोंधळ परिस्थिती तसेच परीक्षा घेण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची कमतरता यामुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर, नियोजित तारखेला परीक्षा घेणे व्यवहार्य नसल्याचे दिसताच एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – MPSC 2026 Exam Schedule : तयारीला लागा! एमपीएससीकडून 2026 मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

नवीन परीक्षा दिनांक जाहीर

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, ४ जानेवारी २०२६, ११ जानेवारी २०२६ या दोन दिवसांत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ आयोजित केली जाणार आहे.

हेही वाचा – राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा; ‘हे’ महत्वाचे नियम लक्षात घ्या?

विद्यार्थ्यांचा संभ्रम अखेर संपला

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अनेक उमेदवारांकडून होत होती. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी सांगितले की, २१ डिसेंबरची परीक्षा होणार की नाही याबाबत मोठी अनिश्चितता होती. आयोगाने निर्णय घेऊन नवीन तारखा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!