Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

MPSC 2026 Exam Schedule : तयारीला लागा! एमपीएससीकडून 2026 मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

MPSC 2026 Exam Schedule : तयारीला लागा! एमपीएससीकडून 2026 मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा अशा विविध परीक्षांच्या अंदाजित तारखा, निकालाचा महिना याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आल्याचे एमपीएससीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

5 ते 9 मे रोजी महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2025 होणार असून, त्याचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर केला जाणार आहे. 16 मे रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2025 होणार आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 17 मे रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 होणार आहे, तर परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2026 मध्ये जाहीर करण्याचे नियोजन आहे.

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2025 अंतर्गत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 7 जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तर सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 2026 अंतर्गत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 31 मे रोजी होऊन ऑगस्टमध्ये निकाल जाहीर केला जाणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा तपशील स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार आहे.

त्याशिवाय 3 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2027मध्ये जाहीर करण्यात येणार आहे. तसेच 15 नोव्हेंबर रोजी, विद्युत अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2026 होणार आहे, तर फेब्रुवारी 2027 मध्ये निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

15 नोव्हेंबर रोजीच महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2026, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2026 आयोजित करून निकाल मार्च 2027मध्ये जाहीर केला जाणार आहे.

21 नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा 2026, निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा 2026 आयोजित करण्यात येणार आहे, तर निकाल मार्च 2027 मध्ये जाहीर केला जाणार आहे. 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2026 आयोजित करून निकाल एप्रिल 2027 मध्ये जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही परीक्षा 14 जून रोजी होऊन निकाल ऑक्टोबरमध्ये, मुख्य परीक्षा 5 डिसेंबर रोजी होऊन निकाल एप्रिल 2027 मध्ये जाहीर होणार आहे. तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही परीक्षा 12 जुलै रोजी होऊन निकाल नोव्हेंबरमध्ये तर मुख्य परीक्षा 13 डिसेंबर रोजी होऊन निकाल एप्रिल 2027 मध्ये जाहीर करण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!