Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मर्सिडीजने ४ वर्षीय चिमुकलीला उडवले; CCTV व्हिडिओ व्हायरल

पुण्यात आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मर्सिडीजने ४ वर्षीय चिमुकलीला उडवले; CCTV व्हिडिओ व्हायरल

Pune Accident : पुणे–अहमदनगर महामार्गावर शिरूर तालुक्यातील बोऱ्हाडेवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मर्सिडीज कारने रस्ता ओलांडत असलेल्या एका चिमुकलीला उडवल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (१ डिसेंबर) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय ४) असं या चिमुकलीचे नाव आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, धडकेनंतर मुलगी चेंडूसारखी हवेत उडून काही फूट अंतरावर डांबरी रस्त्यावर आपटली. कारचा वेग इतका प्रचंड होती की धडक दिल्यानंतरही चालकाने ब्रेकही लावला नाही आणि गाडी घटनास्थळावरून पसार झाली.

गंभीर जखमी झालेल्या शुभ्राला स्थानिकांनी तात्काळ शिरूर येथील वात्सल्य रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर तिला पुण्यातील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. मुलीला चेहऱ्यावर खोल जखमा, जबड्याला मोठी इजा आणि दात पडले आहेत.

आमदार कटके हे नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी वाघोली ते शिरूर मार्गावरून जात असताना हा अपघात घडला. त्यांच्या गाडीत ते स्वतः होते की नाही, याबाबत मात्र स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

घटनेच्या काही तास उलटूनही पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही आणि रुग्णालयातही मुलीच्या नातेवाईकांनी औपचारिक तक्रार केलेली नाही, यामुळे अपघात दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी याची दखल घेऊन स्वतःहून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!