पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, एअर फोर्स स्कूल येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज आता करता येणार आहे.
एअर फोर्स स्कूल, पुणे येथे नृत्य शिक्षक (अर्धवेळ) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 4 नोव्हेंबर, 2025 रोजी मुलाखत घेतली जाणार आहे. एअर फोर्स स्कूल, विमान नगर, पुणे – 411014 येथे मुलाखत असणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.airforceschoolpune.ac.in/या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


