Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News : वडिलांसाठी आईने दिला लिव्हर, कर्जही काढलं, शेवटी दोघांचाही मृत्यू, दोन भावंडांच्या व्यथेने काळजात धस्स…

Pune News : वडिलांसाठी आईने दिला लिव्हर, कर्जही काढलं, शेवटी दोघांचाही मृत्यू, दोन भावंडांच्या व्यथेने काळजात धस्स…

पुणे : शहरातील डेक्कन परिसरातील प्रसिद्ध सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घडलेली ही घटना ऐकून कोणाचेही डोळे पाणावले नाही तर नवलच..! लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे कोवळ्या वयातील बहीण-भाव पोरके झाले. “आता आम्ही जगायचे कसे?” असा असहाय प्रश्न विचारत हे भावंडे दुःखाच्या खाईत बुडाले आहेत.

कर्ज काढून वडिलांच्या जीवासाठी आईने आपला लिव्हर दान करण्याचा निर्णय घेतला, पण शस्त्रक्रियेनंतर दोघेही जग सोडून गेले. हॉस्पिटलच्या हलगर्जीपणावर संशय व्यक्त करत या तरुणाने मदतीची हाक मारली आहे. ही व्यथा ऐकून सगळ्यांचे काळजात धस्स झाले.

वडिलांच्या उपचारासाठी कर्ज, आईचा लिव्हर दान

पुण्यातील डेक्कन परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्यातील बुधवारी ही दर्दनाक घटना घडली. क्रिएटिनची पातळी खूप कमी झाल्यामुळे बापू बाळकृष्ण कोमकर (५५) यांना दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगितले आणि लगेच दुसऱ्या दिवशी ऑपरेशन ठरवलं.

पत्नी कामिनी बाळकृष्ण कोमकर (४८) यांनी पतीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा लिव्हर देण्याचा निर्णय घेतला. मुलाने सांगितले की, “डॉक्टरांनी सांगितले होते की, पतीचा जीव वाचेलच असे नाही, पण दानकर्त्याला (आईला) धोका नाही. पण शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी वडील शुक्रवारी मृत्यू पावले. त्यातून कुटुंब सावरले नव्हते, तर ८ दिवसांनंतर आईचा अचानक मृत्यू झाला. आता आम्ही कसे जगू?”

कामिनी कोमकर यांनी लिव्हर दान केल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि तेही जग सोडून गेल्या. या शस्त्रक्रियेसाठी कुटुंबाने नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. बापू कोमकर हे एका खासगी कंपनीत नोकरी करणारे होते, तर कामिनी गृहिणी होत्या. दोघांचेही अचानक निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलाने सांगितले की, “वडिलांच्या उपचारांसाठी आम्ही सर्वजण धडपडलो, पण शेवटी काहीच हाती लागले नाही. आईने वडिलांसाठी सर्व काही सोडले, पण दोघेही गेले.”

शिक्षण सुरू असतानाच जबाबदारी

या घटनेने बापू कोमकर यांच्या मुलगा (२० वर्षे) आणि लहान बहिण (१७ वर्षे) यांच्यावर मोठी जबाबदारी कोसळली आहे. मुलगा सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून, बहिणही शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. “मला अजून कॉलेजमध्ये शिकायचे आहे, पण आता लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर आहे. ना मामा आहेत, ना काका.

कर्जाचे ओझे डोक्यावर आहे आणि हॉस्पिटलची लोक आमचे पालनपोषण करतील का? त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही वेळ आली,” असे भावंडे रडत रडत सांगत आहेत. “आम्ही जगायचे कसे? आई-वडिलांची मायेची सावली हरपली, आता कोणाकडून मदत मागू?” असा प्रश्न विचारत ते असहाय अवस्थेत आहेत. कुटुंबात इतर कोणीही नसल्याने या भावंडांना एकटे पडले असून, त्यांच्या भविष्याबाबत चिंता वाढली आहे.

हॉस्पिटलवर संशय, मदतीची हाक!

कोमकर कुटुंबाने हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याने उपचार पद्धती आणि डॉक्टरांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हॉस्पिटल प्रशासनाने अद्याप याबाबत अधिकृत विधान दिले नाही, पण कुटुंबाने पोलिसांत तक्रार नोंदवण्याचा विचार सुरू केला आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली असून, लिव्हर ट्रान्सप्लांटच्या जोखमींबाबत जागरूकता वाढवण्याची गरज भासत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!