Today रविवार, 14th जून 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nasrapur death case : नसरापूर हत्याकांडाचा निकाल महिनाभरात? ५३ साक्षीदार, डीएनए पुरावे अन् ११०० पानांचे आरोपपत्र; खटला अंतिम टप्प्यात

Nasrapur death case : नसरापूर हत्याकांडाचा निकाल महिनाभरात? ५३ साक्षीदार, डीएनए पुरावे अन् ११०० पानांचे आरोपपत्र; खटला अंतिम टप्प्यात

Nasrapur death case : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे.

या खटल्यात आतापर्यंत तब्बल ५३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या असून वैद्यकीय, वैज्ञानिक आणि डीएनए पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल पुढील महिनाभरात लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत बाल साक्षीदाराची साक्ष, डीएनए प्रोफायलिंग, वैद्यकीय अहवाल आणि अन्य महत्त्वाचे पुरावे नोंदवले गेले आहेत. आता केवळ सायबर तज्ज्ञ आणि मुख्य तपास अधिकारी यांच्या साक्षी बाकी असून त्या सोमवारी नोंदवण्यात येणार आहेत. दररोज सुनावणी होत असल्याने खटल्याचा वेग कायम आहे.

विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी या प्रकरणात जलद निकाल लागण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वात वेगाने चाललेल्या खटल्यांपैकी हा एक ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, १ मे रोजी नसरापूर येथे घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपास पूर्ण करत न्यायालयात तब्बल ११०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. २९ मेपासून प्रत्यक्ष साक्षी नोंदवण्यास सुरुवात झाली असून पीडितेच्या आई-वडिलांसह अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत.

या प्रकरणातील तांत्रिक आणि डिजिटल पुराव्यांशी संबंधित ‘ई-साक्ष’ प्रक्रियाही पूर्ण झाली असून आता संपूर्ण राज्याचे लक्ष या बहुचर्चित खटल्याच्या निकालाकडे लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!