Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यातील नवले ब्रिजवर थरार; प्रवासी भरण्याच्या वादातून रिक्षाचालकाला बेदम मारहाण, पुलावरून खाली फेकले

पुण्यातील नवले ब्रिजवर थरार; प्रवासी भरण्याच्या वादातून रिक्षाचालकाला बेदम मारहाण, पुलावरून खाली फेकले

Pune Crime : पुण्यातील नवले ब्रिज परिसरात प्रवासी घेण्याच्या किरकोळ वादातून गंभीर हिंसक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. तीन रिक्षाचालकांनी मिळून एका सहकारी रिक्षाचालकावर अमानुष मारहाण करत त्याला थेट पुलावरून खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई–बंगळूर महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात प्रवासी भरण्यावरून रिक्षाचालकांमध्ये वाद झाला होता. हा वाद काही क्षणांतच तीव्र झाला आणि आरोपींनी सूरज माणिक काळे या रिक्षाचालकाला रस्त्यावर पकडून लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी वस्तूंनी बेदम मारहाण केली.

त्यानंतर आरोपींनी त्याला पुलावरून खाली फेकल्याचा प्रकार समोर आला असून, हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गंभीर जखमी अवस्थेत सूरज काळे यांना तातडीने भारतीय विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात बापूसो बाळासाहेब भोसले, गणेश हरिभाऊ धारपले आणि गणेश उर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, या घटनेमुळे वाहतूक व्यवस्थापन आणि रिक्षाचालकांमधील गटबाजीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!