Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पार्थ पवार पुणे जमीन घोटाळ्याबाबत लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा, म्हणाले, ‘मास्टरमाईंड शीतल तेजवानी हवालाचे पैसे…’

पार्थ पवार पुणे जमीन घोटाळ्याबाबत लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा, म्हणाले, ‘मास्टरमाईंड शीतल तेजवानी हवालाचे पैसे…’

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणामुळे मोठे राजकारण तापले आहे. पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याचे पडसाद कुठेना कुठे अजित पवार यांच्यावर पडत आहेत. विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहेत. पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत खरेदी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे आरोप खरे असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे राज्यात अजित पवार यांची मोछी नाचक्की झाली आहे.

विशेष म्हणजे, या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. या प्रकरणी जमीन विक्रेती शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, तसेच सह-दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मोठ्या घोटाळ्याची मास्टरमाईंड शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. आता यावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी खळबळजनक दावा केलाय.

लक्ष्मण हाकेंकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी

लक्ष्मण हाके अजित पवारांचा राजीनाम्याची मागणी केली आहे. अजित पवारांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. अजित पवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, ही आमची मागणी आहे, असे त्यांनी म्हटले.

शीतल तेजवानीबद्दल लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा

लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, शितल तेजवानी परदेशात पळाली ती कशी पळाली? हवाल्याचे पैसे तिला देण्यात आले आहेत, असा खळबळजनक दावा देखील त्यांनी केला. अजित पवार यांच्याकडे एक गुड बुक आणि स्लॅम बुक आहे. त्यांच्याकडे अधिकाऱ्यांची एक फळी आहे जी अशी कामे करते. अनेक जमिनीत अजित पवार यांनी गैरव्यहार केला आहे, असा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केलाय.

लक्ष्मण हाकेंचा पार्थ पवारांवर निशाणा

दरम्यान, लक्ष्मण हाकेंनी फेसबुकवर पोस्ट लिहूनही अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. 1800 कोटींची महार वतनाची जागा 300 कोटीत लाटण्याचं काम पार्थ पवारने केलं. आई वडीलांकडून मुलं संस्कार शिकत असतात. पार्थ पवार दोन तीन वर्षांचे होते. तेव्हा अजित पवारसुनेत्रा पवारांनी बारामतीच्या सोनगावमधीलएकर महार वतन लाटले आणि पार्थ पवारच्या नावे केले, बारा खडी शिकायच्या वयात सातबारा फिरवण्याची कला पार्थ पवारांना शिकवण्यात आली असं म्हणत त्यांनी अजित पवारांसह पार्थ पवारांवर टीका केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!