Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ टोळीतील सदस्याला कर्नाटकातून अटक; घरातून तब्बल ४०० काडतूस जप्त

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ टोळीतील सदस्याला कर्नाटकातून अटक; घरातून तब्बल ४०० काडतूस जप्त

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीवर पोलिस कारवाईचा नवीन भडका उडाला आहे. टोळीचा सक्रीय सदस्य अजय सरोदे (२८, रा. कोथरूड) याच्या घरातून पोलिसांनी तब्बल ४०० काडतूस जप्त केले आहेत. यात २०० जिवंत काडतूस आणि २०० रिकाम्या पुंगळ्या असल्याचे समोर आले आहे.

अजय सरोदे आणि त्याचा साथीदार बटर्या चौधरी (वय २५) यांना कोथरूड पोलिसांनी कर्नाटकातील गाणगापूर येथून ३० नोव्हेंबरला अटक केली. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आल्याने पोलिसांनी सरोदेच्या कोथरूड येथील घरी छापा टाकला, या छाप्यात हा संशयास्पद साठा सापडला. या प्रकरणाने घायवळ टोळीच्या शस्त्रसाठ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कोथरूड पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. अटक पथकात पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण, पोलीस हवालदार चौगुले, पो. शि. विष्णू राठोड, पो. शि. आकाश वाल्मिकी, पो. शि. शितकल यांचा समावेश होता.

अजय सरोदेच्या चौकशीत समोर आले की, तो निलेश घायवळ टोळीचा प्रमुख सदस्य असून, विविध गुन्ह्यांमध्ये सक्रिय भूमिका बजावतो. त्याच्याकडे वैध पिस्तुल परवाना असल्याचेही उघड झाले. हा परवाना २९ जानेवारी २०२४ रोजी पुणे पोलिसांनी जारी केला होता. मात्र, हा परवाना गुन्हेगारी कारवायांसाठी वापरला गेल्याचा संशय आहे.

कोथरूड गोळीबार प्रकरणात सरोदेचा सहभाग

चौकशीत अजय सरोदेने कबूल केले की, १७ सप्टेंबर २०२५ रोजी कोथरूड भागात घायवळ टोळीने केलेल्या गोळीबारात तो घटनास्थळी उपस्थित होता. या गोळीबारात प्रतिस्पर्धी टोळीच्या एका सदस्यावर हल्ला करण्यात आला होता, यामुळे कोथरूड परिसरात दहशत पसरली. या गुन्ह्यात सरोदे सह-आरोपी असल्याने त्याच्यावर आता अतिरिक्त कलमे लावण्यात आली आहेत.

गोळीबार प्रकरणात यापूर्वी मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांना अटक करण्यात आली होती, तर निलेश घायवळ फरार होता. आता सरोदेच्या अटकेने तपासाला वेग मिळाला आहे.

पोलिसांनी सरोदेच्या घरी सापडलेल्या काडतूसमुळे टोळीच्या शस्त्रसाठ्याचा पर्दाफाश झाला. हे काडतूस विविध प्रकारचे असून, काही देशी बनावटीचे आहेत. सरोदेने सांगितले की, हे साहित्य टोळीच्या इतर सदस्यांकडून पुरवले गेले होते. यामुळे घायवळ टोळीच्या इतर सदस्यांवरही छाप्यांची शक्यता वर्तवली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!