Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Land Scam : ‘FIR मध्ये नाव नाही म्हणून…’;  देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर पार्थ पवारांचं वाढणार टेन्शन

Pune Land Scam : ‘FIR मध्ये नाव नाही म्हणून…’;  देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर पार्थ पवारांचं वाढणार टेन्शन

Devendra Fadnavis on Pune Land Scam: पुण्यातील मुंढवामध्ये झालेल्या जमीन घोटाळ्याची गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चा आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावरही आरोप झाले. पण, या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये त्यांचं नाव नाही. त्यामुळे पोलिसांवर मोठी टीका झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘NDTV मराठी’ ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘NDTV मराठी’मंचच्याअनस्टॉपेबल महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावरील प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, पुण्यातील जमिनीच्या प्रकरणात सरकारनं लोकांची मागणी येण्यापूर्वी मी आदेश दिले. FIR दाखल केला. FIR मध्ये तो दोषी आहे असं नाही तसंच FIR मध्ये नाव नाही म्हणून तो दोषी नाही असं होत नाही.

आता या प्रकरणाची चौकशी होईल त्यावेळी अजून कोण दोषी आहे निश्चित होतं. त्यानुसार दोषारोप पत्र तयार होतं.त्यावर दोषी व्यक्ती निश्चित होतं. FIR हा दोषी ठरवत नाही.आम्ही यात कुणालाही वाचवणार नाहीत. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल.

या विषयावर सातत्यानं आवाज मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. कुणीही या प्रकरणात योग्य पुरावा दिला तर तो ग्राह्य धरला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हे सरकार कोणत्याही दोषीला वाचवणार नाही, असं ते म्हणाले.

सरकारमध्ये कुणी चुकीचं करत असेल तर ते 100 टक्के थांबवण्याची माझी ताकद आहे. सुदैवानं नंबर गेमही आता आम्हाला अनुकूल आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!