Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पिंपरी महापालिकेने इंद्रायणीच्या प्रवाहातील 36 बंगल्यावर बुलडोझर चालवले, कोट्यवधींचे अलिशान बंगले पत्त्यासारखे कोसळले

पिंपरी महापालिकेने इंद्रायणीच्या प्रवाहातील 36 बंगल्यावर बुलडोझर चालवले, कोट्यवधींचे अलिशान बंगले पत्त्यासारखे कोसळले

पुणे : पिंपरी- चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रातील अनाधिकृत बंगल्यांविरोधात महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. निळ्या पूर रेषेत उभारण्यात आलेल्या ३६ अनाधिकृत बंगल्यांवर पालिकेने बुलडोझर चालवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आज कारवाई सुरू केली आहे. या तोडकाम कारवाईमध्ये पालिकेचे कर्मचारी मोठ्यासंख्येत सहभागी झाले आहेत. या कारवाईमुळे या बंगल्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

काय आहे प्रकरण?

चिखली येथील इंद्रायणी नदीपात्रात झरे वर्ल्ड बिल्डरकडून निळ्या पूर रेषेत अनाधिकृत ओपन प्लॉटिंग करण्यात आली होती. या ओपन प्लॉटिंगवर जवळपास ३६ जागा मालकांनी कोट्यावधी रुपये खर्च करून आलिशान बंगले बांधले होते.हे बंगले नदीपात्रातील निळ्या पूर रेषेत अनधिकृत पणे उभारण्यात आल्याने या प्रकरणात तक्रारदार आणि बंगले मालक हे राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात गेले होते. या खटल्याच्या अंतिम निकालात सर्वोच्च न्यायालयाने ३१ मे २०२५ पर्यंत सर्व अनधिकृत बंगले पाडून नदीपात्रातील भराव आणि राडारोडा पूर्णपणे उचलण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेला दिले होते.

आज सकाळपासून पिंपरी- चिंचवड महापालिका मोठी विश्लेषणाची कारवाई करत आहे. हे सर्व बंगले जमिनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता इंद्रायणी नदीपात्र मोकळे झाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!