Chandrakant Patil: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे, निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच दुसरीकडे आरोप प्रत्यारोप यांच्यामुळेही राजकारण तापल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच पुण्यातील भाजपचे उमेदवार लहू बालवाडकर यांनी त्यांच्या सोशल मिडीया X वरती पोस्ट करत अमोल बालवडकर यांचे कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचे व्हिडिओ शेअर केले आहेत. हे व्हिडिओ सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. याच मुद्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलेश घायवळ कुठे गेला याचा शोध सुरु आहे. पण मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे निलेश घायवळ यांला शोधायला अमोल बालवाडकरची मदत घ्या असा टोला चंद्रकांत पाटील यांनी अमोल बालवाडकरला लगावला.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी माहिती असतात त्यामुळं अनेक बाबी समोर येतात. अमोल बालवडकर याने कितीही आरडा ओरड केला तरी काही नाही. निलेश घायवाल कुठे गेला याचा शोध घेत आहेत. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे निलेश घायवाल याल शोधायला अमोल बालवाडकरची मदत घ्या. अमोल बालवडकर यांचा निलेश घायवळसोबत व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी बालवडकर यांच्यावर टीका केली.
अमोल बालवडकर किती सुसंस्कृत नेता आहे हे आता कळलं असेल
अमोल बालवडकर किती सुसंस्कृत नेता आहे हे आता कळलं असेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. तिकीट पक्षाचा असतं. आता लक्षात आला असेल की देवेंद्र फडणवीस यांनी अमोल बालवडकर यांचे तिकीट का कापले. हे सगळे असताना एवढं बोलत आहे, निलेश घायवळ यांच्यासोबत ज्याचे फोटो आहेत त्याची मदत होईल, त्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
भाजपचे प्रभाग क्रमांक नऊचे भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांनी व्हिडीओ केला शेअर
भाजपचे प्रभाग क्रमांक नऊचे अधिकृत लहू बालवडकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कुख्यात गुंड निलेश घायवळ, अमोल बालवडकर दारू पार्टी करत असल्याचं दिसून येत आहेत. हा व्हिडिओ ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाहेर आल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत लहू बालवडकर यांनी अमोल बालवडकर यांच्यावर हल्लाबोल करत जोरदार निशाणा साधला आहे. सुसंस्कृत पुण्याची ओळख ही शांतता, विचारशीलता आणि जबाबदार वर्तनाची आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून नागरिकांना हीच अपेक्षा असते, असं पोस्टमधून लहू बालवडकर म्हणाले आहेत.


