Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात राजकीय भूकंप! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत १० दिग्गज नेत्यांचा प्रवेश; पक्षाची ताकद वाढली

पुण्यात राजकीय भूकंप! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत १० दिग्गज नेत्यांचा प्रवेश; पक्षाची ताकद वाढली

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ मिळाले असून, भाजप, शिवसेना (ठाकरे आणि शिंदे गट), मनसे, काँग्रेस आणि शरद पवार गटातील १० दिग्गज नेत्यांनी पक्षात प्रवेश केला.

सोमवारी (२९ डिसेंबर) दुपारपासून रात्री उशिरापर्यंत अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या घडामोडीमुळे विरोधी पक्षांना मोठा हादरा बसला असून, आणखी काही नेते प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

या पक्षप्रवेशामुळे अजित पवार गटाची पुणे महापालिकेतील ताकद आणखी वाढली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत असून, अजित पवार गट घड्याळ चिन्हावर १२५ जागा, तर शरद पवार गट तुतारी चिन्हावर ४० जागा लढवणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही युती असून, तिथे शरद पवार गटाला १८ जागा मिळाल्या आहेत.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे मुख्य १० नेते

१. धनंजय जाधव – भाजप
२. जयराज लांडगे – मनसे
३. दत्ता बहिरट – काँग्रेस
४. शंकर पवार – भाजप
५. मुकारी अलगुडे – भाजप
६. नीता मांजळकर – शिवसेना (ठाकरे गट)
७. आनंद मांजळकर – शिवसेना
८. स्वप्निल दुधाने – राष्ट्रवादी (शरद पवार गट)
९. मधुकर मुसळे – भाजप
१०. प्रकाश ढोरे – मनसे

या प्रवेशांमुळे भाजप आणि शिवसेनेला विशेषतः धक्का बसला आहे. नामांकनाचा आज (३० डिसेंबर) शेवटचा दिवस असून, अजित पवार गटाची रणनीती मजबूत झाली आहे. पुणे महापालिकेत एकूण १६५ जागा असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या घडामोडींमुळे निवडणुकीचे चित्र आणखी रोचक झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!