Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

थेऊर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीस अप्रत्यक्षरीत्या मदत करणारा पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके निलंबित

थेऊर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीस अप्रत्यक्षरीत्या मदत करणारा पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके निलंबित

लोणी काळभोर (पुणे): एका महिलेच्या डोक्यात दगड मारून, तसेच पतीवर पिस्तुलातून गोळीबार करून पसार झालेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान या गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेल्या गुन्हेगारास स्थानिक पोलिसाने मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासात पोलिसानेच गुन्हेगारास अप्रत्यक्षरित्या मदत केल्याचे समोर आल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कर्तव्यास असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी काढला आहे.

थेऊर येथील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी मुख्य आरोपी भरत जैद याला अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे. ज्यावेळी हा गुन्हा घडला, त्यावेळी जैद घटनास्थळी हजर नव्हता, असे साक्षीदार सुदर्शन यशवंत आगळने व प्रतिक रमेश बिटे जबाब तपास टिपणांमध्ये नमुद करुन ती तपास टिपणे गुन्ह्याच्या कागदपत्रांत समाविष्ठ केली. परंतु, लोणी काळभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या तपासादरम्यान आरोपी भरत जैद हा घटना घडली, त्यावेळी घटनास्थळी हजर असल्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक घोडके यांनी बारामती येथील तिरुपती हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून भरत जैद हा बारामतीवरून पुण्याच्या दिशेने येताना त्याच्या इतर ७ साथीदारांसोबत काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीमध्ये आला नाही. तर, तो सुदर्शन आगळमे यांच्यासोबत त्यांच्याकडील शेवोरलेट गाडीमध्ये बसून आला होता. त्यानंतर जैद हा थेऊर मार्गे न जाता हडपसर, विश्रांतवाडी मार्गे गेला होता, असे निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तपासादरम्यान भरत जैद हा गुन्ह्यात जप्त केलेल्या काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीमध्ये बसूनच सुपा पोलीस ठाणे येथून त्याच्या इतर सात साथीदार यांच्यासह निघाला होता.

त्यानंतर मोशी येथे थेऊर, केसनंद मार्गेच गेल्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत. यावरुन पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी आरोपीस आप्रत्यक्षरित्या मदत केल्याचे निष्पन्न होत असल्याचे निलंबन आदेशात नमूद केले आहे. घोडके यांना निलंबन कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी करता येणार नाही. तसेच घोडके यांना दररोज शिवाजीनगर येथील पुणे पोलीस मुख्यालय राखीव पोलीस निरीक्षक यांच्याकडे हजेरीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!