पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असून येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व निवडणूक क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.
सुट्टी लागू असलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायती:
जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद व नगरपचांयतीच्या मतदार संघात सुट्टी असणार आहे.
सुट्टी कोणाला लागू?
– या १७ मतदारसंघांच्या क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये
– सार्वजनिक उपक्रम, बँका, खासगी आस्थापना
– कामानिमित्त बाहेर असलेले मतदार यांनाही ही सुट्टी लागू राहील
जिल्हाधिकारी डुडी यांनी सर्व पात्र मतदारांना मतदान केंद्रावर हजर राहून आपला हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चालणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेतच
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कोणत्याही प्रकारची स्थगिती नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोर्टाच्या या टिपण्णीनंतर राज्यातील स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेतच होतील. २१ जानेवारी २०२६ रोजी आरक्षणाच्या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या टिपण्णीमुळे निवडणूक प्रक्रियेवरचा संभ्रम दूर झाला असून प्रशासनाची तयारी वेगात सुरू आहे.


