Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

निवडणूक कार्यक्रम सुरू राहणार, पण निकाल तात्पुरते! 50 टक्के आरक्षण वादावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल

निवडणूक कार्यक्रम सुरू राहणार, पण निकाल तात्पुरते! 50 टक्के आरक्षण वादावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल

SC On Local Body Election:  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मार्ग मोकळा झाला असून, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका नियोजित वेळेनुसार घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. मात्र, 50 टक्के पेक्षा अधिक आरक्षण असलेल्या संस्थांबाबत निवडणूक आयोगाने विशेष दक्षता घ्यावी, अशी स्पष्ट सूचना कोर्टाने दिली आहे. आज 28 नोव्हेंबर रोजी 50 टक्के आरक्षण मर्यादा उल्लंघनाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली आणि या संदर्भात खंडपीठाने मोठा निर्णय देत स्थिती स्पष्ट केली.

सुनावणीत काय झाले?

निवडणूक आयोगाचे वकील अॅड. बलबीर सिंग यांनी न्यायालयाला माहिती दिली की राज्यातील एकूण निवडणुकांपैकी 22 टकेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची पातळी 50 टक्के च्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट संकेत दिले की ज्या 40 नगरपरिषद क्षेत्रांमध्ये आरक्षण मर्यादा वाढलेली आहे, त्या ठिकाणचे अंतिम निकाल हे न्यायालयाच्या आगामी निर्णयावर अवलंबून राहतील. आवश्यक असल्यास त्या निवडणुका थांबवल्या देखील जाऊ शकतात, असे खंडपीठाने नमूद केले.सओबीसी आरक्षणासाठी स्थापन झालेल्या बांठिया आयोगाबाबत अॅड. इंदिरा जयसिंग यांनी रोखठोक मांडणी करत सांगितले की आयोगाच्या शिफारशी ओबीसी समुदायाला पूर्ण न्याय देऊ शकत नाहीत. अनेक क्षेत्रांमध्ये ओबीसींना अपेक्षित आरक्षण लाभ मिळत नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

हेही वाचा – Local Body Elections | निवडणुकांच्या प्रचारासाठी मुदत वाढवली; राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

आगामी कार्यवाहीबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी 2026 च्या दुसऱ्या आठवड्यात तीन न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठासमोर ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. याचिकाकर्त्यांकडून यावेळी निवडणुका थांबवण्याची मागणी झाली असली तरी, कोर्टाने ती नाकारत अधिसूचित कार्यक्रम चालू ठेवण्याची परवानगी दिली. सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका वेळापत्रकानुसारच होतील. मात्र 40 नगरपरिषद आणि 17 नगरपंचायतींचे निकाल हे न्यायालयाच्या अंतिम आदेशावर अवलंबून राहतील. 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण असलेल्या संस्थांमध्ये कोणताही कायदेशीर धोका टाळण्यासाठी आयोगाने विशेष दक्षता बाळगावी

काय आहे प्रकरण? 

राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी सर्वत्र 27 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा वाद निर्माण झाला. या निर्णयामुळे अनेक नागरी आणि ग्रामीण संस्थांमध्ये एकूण आरक्षणाची रक्कम 50 टक्क्यांची घटनात्मक मर्यादेपेक्षा जास्त झाली असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. यापूर्वी देण्यात आलेला जे.के. बांठिया आयोगाचा अहवाल हा अद्याप न्यायालयीन पुनरावलोकनाखाली आहे, त्यामुळे त्यानुसार राज्य सरकारने तातडीने आरक्षण लागू करणे योग्य नव्हते, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सध्या राज्यातील अनेक संस्थांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!