Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

साहित्य क्षेत्रात शोककळा! सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग काळाच्या पडद्याआड

साहित्य क्षेत्रात शोककळा! सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग काळाच्या पडद्याआड

Mirza Rafi Ahmed Baig Passes Away: मराठी विनोदी काव्यसृष्टीला आपली स्वतंत्र ओळख देणारे, ‘मिर्झा एक्सप्रेस’साठी प्रसिद्ध असलेले कवी आणि हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे अमरावतीत आज (शुक्रवार, २८ नोव्हेंबर) पहाटे ६.३० वाजता निधन झाले. वयाच्या ६८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्बल काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देत होते आणि अमरावतीत त्यांच्यावर उपचार सुरू होते.

अमरावतीत वास्तव्य

नेर तालुक्यातील धनज-माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव असले तरी, ते अमरावतीतील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘मिर्झा एक्सप्रेस’ नावाच्या निवासस्थानी राहात होते. त्यांच्या मागे पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज आणि दोन कन्या महाजबी व हुमा असा परिवार आहे. दुपारी दोननंतर अमरावतीतील ईदगाह कब्रस्तानात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा – अभिनेत्री फातिमा सना शेखने सांगितला बालपणीचा ‘तो’ किस्सा; पहिल्यांदाच बोलली क्रशबद्दल…

विदर्भ-मराठवाडा ते महाराष्ट्रभर, जिथे काव्यमैफल तेथे ‘मिर्झा एक्सप्रेस’ची लोकप्रियता होती. ६ हजारांहून अधिक काव्यवाचनाचे विक्रम त्यांच्या नावावर आहेत. वीस स्वतंत्र काव्यसंग्रहांनी साहित्यजगत समृद्ध करणारे डॉ. मिर्झा हे विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे तेजस्वी व्यक्तिमत्त्वही होते. त्यांची बोली, त्यांचा धडाका, आणि पोट धरून हसवणारे विनोद यामुळे प्रत्येक कार्यक्रमात प्रेक्षकांवर जणू हास्याचा वर्षाव होत असे. ग्रामीण भाषेतील तडका, सामाजिक विषयांवरची मार्मिक टिप्पणी, आणि सहजसुंदर मांडणी यांमुळे त्यांची शैली अद्वितीय बनली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!