Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विरोधकांना थेट कापून टाकण्याची मानसिकता कुठून येते? रोहित पवारांचा संतप्त सवाल

विरोधकांना थेट कापून टाकण्याची मानसिकता कुठून येते? रोहित पवारांचा संतप्त सवाल

Ashish Deshmukh Controversy: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. प्रचार सभांत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगताना दिसत आहे. महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांवर टीका करत असतानाच, कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीतील एका सभेत भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केलेले वक्तव्य नव्या वादाला कारण ठरले आहे. प्रचारादरम्यान देशमुखांनी विरोधकांना उद्देशून “जास्त वळवळ केली तर कापून काढू” अशी उघड धमकी दिल्याचा आरोप होत आहे. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले असून, विरोधी पक्षांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रोहित पवारांचा थेट सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आशिष देशमुखांचा व्हिडिओ शेअर करत जोरदार टीका केली. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोघेही नागपूरचे, आणि सभेतून आमदार विरोधकांना ‘कापून काढू’ अशी धमकी देतात! ही भाषा नक्षलवाद्यांची नव्हे तर भाजप आमदाराची आहे. राजकीय मतभेद असतात, पण विरोधकांना संपवण्याची मानसिकता लोकशाहीला धोकादायक आहे.” तसेच पुढे ते म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी या वक्तव्यावर स्पष्ट भूमिका घ्यावी. अन्यथा या धमकीला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे मानले जाईल.”

हेही वाचा – “आपले जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील याचा विचार करावा”; जयकुमार गोरेंचा रोहित पवारांना इशारा

सभेत मंत्री बावनकुळेही उपस्थित

देशमुखांच्या या विधानावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढला आहे. कळमेश्वर परिसरात नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर भाजपचा प्रचार करतो का अशी विचारणा करून एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणामुळे वातावरण आधीच तापले होते. त्यात देशमुखांच्या वक्तव्यामुळे राजकीय तणाव अधिक चिघळला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!