Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सीमाभिंतीचे २०० कोटींचे टेंडर पुणे महापालिकेकडून रद्द; भाजपच्या आमदारांवर आली नामुष्कीची वेळ

सीमाभिंतीचे २०० कोटींचे टेंडर पुणे महापालिकेकडून रद्द; भाजपच्या आमदारांवर आली नामुष्कीची वेळ

पुणे: शहरातील पुरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सीमाभिंत बांधण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून २०० कोटी रूपयांचे टेंडर काढण्यात आले होते. मात्र राज्य सरकारकडून निधी न मिळाल्याने अखेर पालिकेने हे टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठेकेदारांचे यासंदर्भातील पैसेही परत देण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पुथ्वीराज बी.पी यांनी दिली आहे. त्यामुळे भाजप आमदारांवर नामुष्कीची वेळ आली आहे.

पुण्यात २५ सप्टेंबर २०१९ ला ढगफुटी होऊन आंबिल ओढ्याला पूर आला. वस्त्या, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, अनेक सोसायट्‌यांच्या सीमा भिंती पडल्या. २० पेक्षा अधिक जणांचा यामध्ये बळी गेला होता. त्यानंतर महापालिकेने आंबील ओढ्‌याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षण भिती, नवीन पूल बांधले. पण काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे काम करता आले नाही. राज्य सरकारने या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मार्च महिन्यात मंजूर केला. राज्य सरकारने यानंतर ३० जुलै रोजी स्वतंत्र आदेश काढत या निधीचे वितरण करण्यास मान्यता दिली. त्यासाठी शहरात कोणकोणत्या भागात सीमाभिंत बांधल्या जाणार आहेत, याचा स्पष्ट उल्लेख करून, त्यासमोर खर्चाची तरतूद केली होती. मात्र महानगरपालिकेच्या तिजोरीत यासंदर्भात एक रूपयाही जमा करण्यात आला नाही. त्यामुळे सहा महिन्यानंतर पालिकेने हे टेंडर रद्द केले आहे.

शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी या २०० कोटी रूपयांच्या निधीसाठी पालिकेला पत्र देऊन त्याबाबतचे वर्गीकरण सुचविले होते. त्यानुसार कामे सुचविण्यात आली होती. या २०० कोटी रूपयांच्या टेंडरवरून पुण्याच्या राजकारणात चर्चा झाली होती. माजी नगरसेवकांनी या सीमाभिंतीच्या टेंडरमध्ये आपली कामे सुचवली होती. पालिकेच्या तिजोरीत पैसे जमा करण्यात न आल्याने आणि टेंडर प्रकिया सुरू होऊन सहा महिन्याचा काळ संपला असल्याने प्रक्रियेनुसार टेंडर रद्द झाले आहे.

लष्काराच्या हददीतील पाणी तुंबणारी ठिकाणे शोधणार

शहरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. अनेकदा लष्कारच्या भागातून शहरात पूराचे पाणी येत असते. लष्काराची परवानगी नसल्याने पुणे महानगरपालिकेला याठिकाणी काम करताना अडचणी येतात. त्यामुळे लष्काराच्या कोणत्या भागातून पावसाळ्यात पाणी येते याबाबत आज (गुरूवारी, दि. २४) लष्कारी अधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात समन्वय ठेवून काम केले जाणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!