Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणेकरांना महागाईचा झटका! CNG दरात २ रुपयांची वाढ; राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किंमती काय?

पुणेकरांना महागाईचा झटका! CNG दरात २ रुपयांची वाढ; राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किंमती काय?

Petrol Diesel Rate : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून प्रति किलोमागे २ रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. काल मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. विशेष म्हणजे ही दरवाढ सध्या केवळ पुणे परिसरापुरतीच मर्यादित आहे.

दरम्यान, सीएनजीचे दर वाढले असले तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. राज्यभरात इंधनाचे दर स्थिर असून गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठा चढ-उतार झालेला नाही.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मुंबईत पेट्रोल १०३.५४ रुपये तर डिझेल ९०.०३ रुपये प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोल १०३.९९ आणि डिझेल ९०.५२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. साताऱ्यात पेट्रोलचा दर सर्वाधिक १०५.१३ रुपये असून छत्रपती संभाजीनगरमध्ये १०५.०९ रुपये आहे.

सीएनजी दरवाढीचा थेट परिणाम रिक्षा, कॅब चालक तसेच रोजच्या प्रवासासाठी सीएनजी वाहनांचा वापर करणाऱ्या नागरिकांवर होणार असून प्रवास खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!