Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: आळंदीत दुहेरी हत्याकांड; गाढ झोपेत 6 वर्षीय चिमुकलीचा गळा आवळला, वृद्धेच्या डोक्यावर वार करून हत्या

Pune Crime: आळंदीत दुहेरी हत्याकांड; गाढ झोपेत 6 वर्षीय चिमुकलीचा गळा आवळला, वृद्धेच्या डोक्यावर वार करून हत्या

Pune Crime: वारकरी संप्रदायाची पावन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीत एक धक्कादायक घटना घडली आहे. केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी येथे एका ६ वर्षांच्या चिमुरडीची गळा आवळून, तर तिला सांभाळणाऱ्या ७९ वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमानवाडी येथील रहिवासी संगीता दत्तात्रय गवारी या नेहमीप्रमाणे केळगाव येथील इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगच्या कामासाठी रात्रपाळीला गेल्या होत्या. घरी त्यांची नात धनश्री सोनू दत्तात्रय केदारी (वय ६ वर्षे) आणि तिला सांभाळण्यासाठी शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७९ वर्षे) या दोघीच होत्या. मध्यरात्री अज्ञात इसमाने घरात शिरून गाढ झोपेत असलेल्या धनश्रीचा गळा आवळला, तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून दोघांचीही हत्या केली. गुरुवारी सकाळी संगीता गवारी या कामावरून घरी परतल्यानंतर हा भीषण प्रकार उघडकीस आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच आळंदीपोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुहेरी हत्याकांडामागील नेमका उद्देश काय? चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला की काही जुन्या वादातून, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे आळंदी आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!