Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अवकाळीग्रस्तांना सरकारकडून लवकरच मिळणार भरपाई; चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अवकाळीग्रस्तांना सरकारकडून लवकरच मिळणार भरपाई; चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

Crop Compensation: राज्यात गेल्या काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा पुरता कोलमडला आहे. मात्र, “संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही,” अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे आश्वासक विधान त्यांनी केले.

युद्धपातळीवर पंचनाम्यांचे आदेश
उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने रब्बी पिके आणि फळबागांचे अतोनात नुकसान केले आहे. या परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तातडीने आणि वस्तुनिष्ठ ‘पंचनामे’ करण्याचे निर्देश दिले आहेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी या सर्वेक्षणातून सुटू नये, अशी सक्त ताकीद प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आली आहे.

पुढील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब
नुकसान भरपाईच्या प्रक्रियेबाबत अधिक माहिती देताना बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांशी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मदतीच्या रकमेवर अंतिम निर्णय घेतला जाईल. सर्वेक्षणाचा अहवाल हाती येताच तातडीने ‘जीआर’ (शासन निर्णय) काढून निधी वितरित केला जाईल.

शेतकऱ्यांना आधार: ‘थेट खात्यात मदत’
ऐन काढणीच्या वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मात्र, शासनाकडून युद्धपातळीवर सुरू असलेल्या या हालचालींमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. पंचनामे पूर्ण होताच मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!