पुणे : २५ एप्रिलच्या रात्री दीड वाजताचा एका पेशंटच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची हेळसांड आणि मुंबई नर्सिंग कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पूना हॉस्पिटला पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून २४ तासांत खुलासा करण्याची नोटीस पाठविली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकरणातील रुग्णावर शहरी गरीब योजनेतून मोफत उपचार करण्यात आले होते.
त्यामुळे पूना हॉस्पिटलकडून रुग्णाला सात हजार रुपयांचा परतावा (रिफंड) मिळणार असल्याचे समोर आले होते. जर बिल भरावेच लागणार नव्हते. तर, मग आठ तास पूना हास्पिटलने मृतदेह का दिला नाही? असा सवाल नोटीसीत उपस्थित करण्यात आला आहे. या नोटिसीत आरोग्य प्रमुख डॉ. मीना बोराडे यांनी तातडीने उत्तर मागितले आहे. अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे.


