Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणी ससूनचे माजी वैद्यकीय अधीक्षक अजय तावरे ताब्यात

पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणी ससूनचे माजी वैद्यकीय अधीक्षक अजय तावरे ताब्यात

पुणे : पुणे शहरात 2022 मध्ये गाजलेल्या किडनी रॅकेट प्रकरणी एक खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.या रॅकेटमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांचा सहभाग असल्याचं काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं. त्यानंतर आता या प्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. किडनी रॅकेट प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. आज अजय तावरेला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेटमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक अजय तावरेचा सहभाग असल्याने समोर आल्यानंतर त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. अजय तावरेला या गुन्ह्यात सह आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तावरे सध्या पोर्शे अपघात प्रकरणात गेल्या वर्षभरापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

कोल्हापूरमधील एका महिलेला कथितपणे १५ लाख रुपयांचे आमिष दाखवण्यात आले होते. तिने एका प्रत्यारोपणाची गरज असलेल्या पुरुषाची पत्नी असल्याचे खोटे भासवले आणि एका तरुण महिला रुग्णाला आपली किडनी दान केली. त्याच्या बदल्यात त्या तरुण महिलेच्या आईने त्या पुरुषाला किडनी दान केली होते.२९ मार्च २०२२ रोजी, ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाल्यानंतर चार दिवसांनी, संबंधित महिलेने पैशांवरून झालेल्या वादानंतर आपली खरी ओळख उघड केली. त्यामुळे रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी ही घटना आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिली.

तावरे याची किडनी प्रत्यारोपणात मुख्य भूमिका आहे. तावरे याला किडनी देणारे आणि किडनी घेणारे हे दोघेही बनावट आहेत हे माहिती होते. तावरे यानेच त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांनी किडनी देताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली होती. डॉ. तावरे हा तेव्हा रिजनल ऑथरायझेशन कमिटीचे अध्यक्ष असल्याने त्याने बनावट कागदपत्रांना मान्यता दिली असल्याचे नमूद करण्यात आले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!