Pune Water Cut: पुणे शहरातील नागरिकांना 18 सप्टेंबर 2025 रोजी मोठ्या पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले आहे की, जुन्या जलकेंद्रांवर सुरू होणाऱ्या दुरुस्ती व देखभालीच्या कारणास्तव शहरातील अनेक भागांना या दिवशी पाणी मिळणार नाही. पार्वती, वडगाव, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, खडकवासला जॅकवेल, वारजे फेज 1 व 2, एसएनडीटी, वारजे आणि नवीन होळकर पंपिंग केंद्र या ठिकाणी कामे होणार आहेत. त्यामुळे या परिसरातील पाणीपुरवठा संपूर्णपणे बंद राहील.
बाधित क्षेत्रांची यादी
पार्वती एचएलआर टँक परिसर: सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर, लेक टाऊन, अप्पर-लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी, पार्वती गावठाण आदी.
वडगाव पाणी केंद्र: हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, येवलेवाडी, सहकारनगर भाग 2 इ.
राजीव गांधी पंपिंग: संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक-खुर्द, वंडर सिटी, मोरेबाग, सुंदरबन सोसायटी, कात्रज गावठाण, भारत नगर आदी.
वारजे व पॅनकार्ड क्लब टँक क्षेत्र: बावधन, भुसारी कॉलनी, कर्वेनगर, बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड रोड, मेडीपॉईंट रोड, इंगळेनगर, शाहूनगर, वारजे जकात नाका परिसर आदी.
एसएनडीटी (HLR) क्षेत्र: गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, सेनापती बापट रोड, जनवाडी, भोसलेनगर, प्रभात रोड, अशोकनगर आदी.
पाषाण व सुस गोल टाकी: गणराज चौक, पॅनकार्ड रोड आणि वीरभद्रनगरचा काही भाग.
पाणी कपाचीच्या दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की, 19 सप्टेंबरच्या सकाळी पाणीपुरवठा सुरू होईल, परंतु सुरुवातीला हा पुरवठा कमी दाबाने असेल.
प्रशासनाचे आवाहन
महापालिकेने पुणेकरांना विनंती केली आहे की, 18 सप्टेंबरपूर्वी पुरेसे पाणी साठवून ठेवावे आणि पाणी वापरताना शक्य तितकी बचत करावी, जेणेकरून गैरसोय होणार नाही.


