Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ३ कोटींचा गांजा जप्त, सात आरोपी जेरबंद

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ३ कोटींचा गांजा जप्त, सात आरोपी जेरबंद

Pune News : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरराज्यीय गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड केले आहे. या कारवाईत तब्बल ३ कोटी ३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यापासून सुरू असलेल्या तपासात आतापर्यंत ६३४ किलो गांजा, दोन चारचाकी वाहने आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ताज्या कारवाईत पोलिसांनी २३ किलो गांजा हस्तगत केला.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रकाश काटे, समाधान गायकवाड, प्रिन्सकुमार सिंग, राहुल गोरे, विकी कांबळे, संग्राम सिंग आणि जॉकी माझी यांचा समावेश आहे.

छत्तीसगडमधून पश्चिम महाराष्ट्रात तस्करी

तपासादरम्यान आरोपी छत्तीसगडमधून मोठ्या प्रमाणावर गांजा आणून पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात विक्री करत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी सापळा रचून आरोपींचा पाठलाग केला.

एका वाहनातून १३४ किलो गांजा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत सुमारे ३३ लाख ५५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. तर दुसऱ्या वाहनातून २३ किलो गांजा सापडला.

‘पठाण गँग’चा तपासही वेगात

दरम्यान, कल्याण पोलिसांनीही मोठी कारवाई करत तब्बल ३४ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. या प्रकरणात कुख्यात ड्रग्ज माफिया अमजद युसूफ पठाणसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, मुंबईतील काही प्रकरणांशी त्यांचे संबंध तपासले जात आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!