Water Crisis : खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने पुणे महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. धरणांमध्ये केवळ ५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने आजपासून शहरातील अनेक भागांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
मान्सूनचे आगमन अद्याप पूर्णपणे झाले नसल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि काटकसरीने करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सम आणि विषम तारखांनुसार पाणीपुरवठा
महापालिकेने शहरासाठी सम आणि विषम तारखांचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार काही भागांना सम तारखेला तर उर्वरित भागांना विषम तारखेला पाणीपुरवठा केला जाणार आहे.
सम तारखेला पाणी मिळणारे प्रमुख भाग
आपटे रोड
भांडारकर रोड
प्रभात रोड
शिवाजीनगर
डेक्कन जिमखाना
एरंडवणे गावठाण
बोपोडी
बाणेर
औंध
बालेवाडी
भोसलेनगर
अशोकनगर
दत्तवाडी
मंगळवार पेठ
नाना पेठ
भवानी पेठ
पुणे स्टेशन परिसर
बी. टी. कवडे रोड
घोरपडी परिसर
विषम तारखेला पाणी मिळणारे प्रमुख भाग
एरंडवणा
बावधन खुर्द
बावधन बुद्रूक
संतोषनगर
दत्तनगर
आंबेगाव खुर्द
सिद्धार्थनगर
पद्मावती
तळजाई वसाहत
संभाजीनगर
चिंतामणीनगर
बकुळनगर
शिवतेजनगर
ओंकारनगर
भाग्योदयनगर
शिवनेरीनगर
साईबाबानगर
काही भागांमध्ये वेळ कायम, पण पुरवठा एक दिवसाआड
वारजे माळवाडी, कर्वेनगर पाट, रामनगर, शिवणे, उत्तमनगर आदी भागांमध्ये पाणीपुरवठ्याची वेळ पूर्वीप्रमाणेच राहणार असली तरी पुरवठा एक दिवसाआड होणार आहे. ससेवाडी परिसरात मात्र टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे.
नागरिकांना आवाहन
प्रशासनाने नागरिकांना वाहन धुणे, बागांना अतिरिक्त पाणी देणे, पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणे टाळण्याचे आवाहन केले आहे. मान्सूनचा जोर वाढेपर्यंत ही पाणीबचतीची उपाययोजना सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाण्याचे योग्य नियोजन करून वापर करावा, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.


