Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Weather Update : पुण्यात तापमानाचा लपंडाव सुरूच; पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार

Pune Weather Update : पुण्यात तापमानाचा लपंडाव सुरूच; पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात तापमानात चढ-उतार कायम असून, पुढील दोन दिवस हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे. सायंकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) व्यक्त केला आहे.

गुरुवारी (ता. ५) शहरात कमाल तापमानात किंचित वाढ नोंदवण्यात आली, तर किमान तापमानात फारसा बदल झाला नाही. पुण्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

सकाळी गारवा, दुपारी उकाडा

तापमानातील तफावतामुळे सकाळी आणि रात्री गारवा जाणवत असून, दुपारच्या वेळी कडक ऊन आणि उकाडा नागरिकांना सहन करावा लागत आहे. सायंकाळी मात्र ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

पुढील दोन दिवस हवामान स्थिर

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुणे आणि परिसरात पुढील दोन दिवस किमान आणि कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर मात्र किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शुक्रवारी (ता. ६) देखील शहरात हवामान स्थिर राहण्याचा अंदाज असून, तापमानात मोठा बदल अपेक्षित नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!