Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Election 2026 : पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी राजकीय बॉम्ब; रवींद्र धंगेकरांनी भाजप नेत्याचा डान्सबारमधील व्हिडीओ केला व्हायरल

Pune Election 2026 : पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी राजकीय बॉम्ब; रवींद्र धंगेकरांनी भाजप नेत्याचा डान्सबारमधील व्हिडीओ केला व्हायरल

Pune Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या काही तास आधी पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत मोठा आरोप केला आहे. धंगेकरांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाजपच्या नेत्याचा डान्सबारमधील व्हिडीओ बाहेर काढत राजकीय खळबळ उडवून दिली आहे.

धंगेकरांनी आपल्या पोस्टमध्ये भाजपवर टीका करत म्हटले आहे की, उमेदवारी वाटप करताना भाजपने जणू ‘चारित्र्यहीन लोकांसाठी वेगळे आरक्षण’च ठेवले आहे. प्रचार प्रमुखच जर महापालिकेच्या टेंडरमधील पैसा डान्सबारमध्ये उडवत असेल, तर अशा लोकांना तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवायच्या, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

भाजप उमेदवाराच्या पतीचा व्हिडीओही व्हायरल

धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक १२ मधील भाजपच्या एका महिला उमेदवाराच्या पतीचाही उल्लेख केला आहे. या व्यक्तीचा देखील डान्सबारमधील व्हिडीओ व्हायरल झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघातील भाजप आमदारांचे आर्थिक व्यवहार सांभाळतो आणि याच पैशातून बारबाळांसाठी ‘कोटा’ राखून ठेवला असल्याचा गंभीर आरोप धंगेकरांनी केला आहे.

भाजप नेत्यांना खुलाशाचं आव्हान

संस्कृती, मूल्ये आणि शुचिता याबाबत भाषण करणारे खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर खुलासा करावा, अशी मागणीही धंगेकरांनी केली आहे. भाजपमध्ये चारित्र्यहीन लोकांसाठी किती जागा राखीव आहेत, हे जनतेला सांगावे, असा टोला लगावत त्यांनी “हीच भाजपची ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे,” असा उपरोधिक उल्लेख केला आहे.

मतदानापूर्वी राजकीय वातावरण तापले

मतदानाच्या अगदी तोंडावर झालेल्या या आरोपांमुळे पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, या प्रकरणावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आरोपांचा मतदारांवर किती परिणाम होतो, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!