Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune: रिंग रोड प्रकल्पाचा प्लॅन तयार; 177 गावांचा कायापालट, जाणून घ्या सर्व माहिती

Pune: रिंग रोड प्रकल्पाचा प्लॅन तयार; 177 गावांचा कायापालट, जाणून घ्या सर्व माहिती

पुणे: पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला आहे. यासाठी या रिंग रोडच्या परिसरातील 117 गावांचा नियोजनबद्ध विकास करण्याचा उद्देश आहे. या 117 गावांच्या विकासाला लवकरच गती मिळणार आहे. या गावांमध्ये शाळा, ट्रक टर्मिनल, लॉजिस्टिक पार्क, टाउनशिप आणि ट्रॉमा केअरसारख्या अत्याधुनिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. भोर, हवेली, मुळशी, पुरंदर आणि वेल्हे या तालुक्यांमधील गावांचा विकास ‘एमएसआरडी’ ला सोपवण्यात आला आहे. यासाठी सुमारे 668 चौरस.किमी क्षेत्राचे नुकतेच सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.

गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

रिंग रोड प्रकल्पाअंतर्गत जी गावे येतात त्यांचा विकास कसा करता येईल, हे स्पष्ट करण्यासाठी व त्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी ड्रोनद्वारे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. याद्वारे सर्व गावांमधील उपलब्ध असलेल्या सुविधा, बांधकामे आणि जमीन वापर याची माहिती गोळा केली गेली आहे. गावातील मोकळ्या जागांचा वापर कसा करता येईल याचा विचार करून विकासाचे नियोजन आखले जाणार आहे.

117 गावांचा होणार सर्वांगीण विकास

पुणे रिंग रोडभोवतीच्या 117 गावांचा विकास आराखडा तयार करताना पुढील 20 वर्षांतील गरजा आणि वाढणारी लोकसंख्या यांचा विचार करण्यात आला आहे. या गावांमध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण, शिक्षण आणि उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे नियोजन केले जाणार आहे. तसेच, पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

पायाभूत सुविधांचे नियोजन

येणाऱ्या काळात लोकसंख्या वाढ होऊ शकते. पाण्याची कुठलीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी, विकास आराखड्यात पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी पाण्याच्या टाक्या, जलवाहिनी आणि पाणीपुरवठा यंत्रणेसाठी आवश्यक तेवढी जागा आरक्षित ठेवली जाणार आहे. नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करण्याचे मोठे नियोजन आहे. या परिसराचा सुनियोजित आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी दोन ‘ग्रोथ सेंटर्स’ विकसित केले जाणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!