Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा कहर! मुंबईसह कोकणात येलो अलर्ट; पुढील ५ दिवस उकाडा वाढणार

Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा कहर! मुंबईसह कोकणात येलो अलर्ट; पुढील ५ दिवस उकाडा वाढणार

Maharashtra Weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसानंतर आता उन्हाचा तडाखा वाढू लागला असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरात तापमान वाढल्याने दिवसेंदिवस उष्णता जाणवू लागली आहे.

हवामान विभागाने कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देत येलो अलर्ट जारी केला आहे. कोकण भागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उकाडा वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबईसाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे असून तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातील तापमानात चढ-उतार दिसून येत आहेत. अकोला येथे ३८.७ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली, तर निफाड येथे १५.५ अंश सेल्सिअस नीचांकी तापमान नोंदवले गेले.

सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात मात्र उष्णतेचा जोर कायम राहणार आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना आता वाढत्या उकाड्यामुळे सर्वसामान्य नागरिकही हैराण झाले आहेत. त्यामुळे दुपारच्या उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!