Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shyam Manav : अशोक खरात हा एकनाथ शिंदे अन् रुपाली चाकणकरांचा गुरु, श्याम मानव यांचा खळबळजनक आरोप

Shyam Manav : अशोक खरात हा एकनाथ शिंदे अन् रुपाली चाकणकरांचा गुरु, श्याम मानव यांचा खळबळजनक आरोप

Shyam Manav : श्याम मानव यांनी नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. खरातचा संबंध एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकर यांच्याशी जोडला गेल्यामुळेच या प्रकरणाचा सखोल तपास सुरू झाला, असा दावा त्यांनी केला आहे. (Shyam Manav)

श्याम मानव यांच्या मते, जर अशोक खरातसारख्या भोंदू बाबाचा संबंध प्रभावशाली राजकीय नेत्यांशी आला नसता, तर हे प्रकरण कदाचित सुरुवातीलाच दडपले गेले असते. उलट, आता या प्रकरणाचा वापर राजकीय पातळीवर ‘धडा शिकवण्यासाठी’ केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

त्यांनी पुढे सांगितले की, खरात हा लोकांची आर्थिक माहिती मिळवून बनावट आयकर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून धाडी टाकत असे आणि त्यातून पैसे उकळत असे. या प्रकरणात अनेक अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्ती त्याचे अनुयायी असल्याचाही दावा त्यांनी केला. (Shyam Manav)

महिलांशी संबंधित मुद्द्यावरही त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “भोंदू बाबा महिलांना फसवण्यासाठी भीतीचा वापर करत नाहीत, तर ‘गुरू’ म्हणून स्वतःला घोषित करून विश्वास संपादन करतात,” असे सांगत त्यांनी समाजातील अंधश्रद्धेवर कठोर टीका केली.

दरम्यान, या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, खरात प्रकरणाचा तपास आणि त्यातील राजकीय कनेक्शन याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!