Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar Vs Mahesh Landge: सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! अजित पवारांवर आरोप करणाऱ्या महेश लांडगेंच्या भोसरीत बैठकांना सुरूवात

Ajit Pawar Vs Mahesh Landge: सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! अजित पवारांवर आरोप करणाऱ्या महेश लांडगेंच्या भोसरीत बैठकांना सुरूवात

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांच्या मदतीला पत्नी सुनेत्रा पवार ही धावल्या आहेत. भाजपचे आमदार पैलवान महेश लांडगेंच्या भोसरीत त्यांनी बैठका घेतल्या. पैलवान महेश लांडगेंनी अजित पवारांवर एकेरी भाषेत हल्लाबोल केला, आता मी तुमच्या वाकड्यात गेलोय, आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत, अशी वादग्रस्त टीका ही त्यांनी केली. तसेच अजित पवार हे महाराष्ट्राचे आका आहेत, असा घणाघात ही त्यांनी केला. त्यानंतर पतींवर एकेरी भाषेत आरोप करणाऱ्या महेश लांडगेंच्या भोसरीत सुनेत्रा पवारांनी चार तास ठाण मांडून बरीच जुळवाजुळव केली. महेश लांडगेंवर त्यांनी काही भाष्य केलं नाही, मात्र त्यांच्या विधानसभेत बैठका घेऊन त्यांनी मी पण मैदानात उतरले, हे दाखवून देण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवारांनी केला.

नेमकं काय घडलं होतं?
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना बघायला मिळत आहे. इथं प्रचारसभेतून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर जहरी टीका करताना दिसत आहे . अशातच भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांविरोधात थेट दंड थोपाटले आहेत. लांडगे यांनी अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका केली आहे. अजित पवार यांनी काही वर्षींपूर्वी विजय शिवतारे यांना उद्देशून आख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मी ठरवलं तर एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करतो. तू कसा आमदार होतो, तेच बघतो, अशी टीका केली होती. अजित पवारांच्या याच जुन्या वक्तव्याचा आधार घेत महेश लांडगे यांनी अजित पवारांची मिमिक्री करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

आख्ख्यामहाराष्ट्राला माहीत आहे, मी जर ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो, तर आम्ही काय बांगड्या घातल्यात का? अरे आमच्या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. आमच्या देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आहेत. याच तुझा कार्यक्रम करतील. तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या…” अशी टीका महेश लांडगे यांनी केली.

लांडगेंच्या वक्तव्यावर अजित पवारांच प्रत्युत्तर

तर लांडगेंच्या वक्तव्यावर अन्ऐ केरी उल्लेखावर अजित पवारांना आज जाहीरनामा प्रकाशित झाल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा अजित पवार म्हणाले, अरे तो मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं तुला ठावूक नाही का? आपण आपल्या मुलांना किंवा आपल्यापेक्षा छोट्यांना, गडीमाणसाला आपण या,बसा, पाणी आणून देता का हो , असं विचारत नाही, ये पाणी आणून दे असं म्हणतो ,त्यामुळे तो मोठा आहे त्यामुळे त्याला अजित पवार चिल्लर वाटतो आहे. म्हणून तो माझा ऐकेरी उल्लेख करतो, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!